October 23, 2025 2:33 PM

printer

यमुनोत्री आणि केदारनाथ धामची कवाडं आज विधिवत बंद केली

भाऊबीजेच्या दिवशी प्रथेनुसार उत्तराखंडमधल्या यमुनोत्री आणि केदारनाथ धामची कवाडं आज विधिवत बंद करण्यात आली.  यानिमित्तानं मंदिरावर रोषणाई तसंच मंदिरात फुलांची आरास करण्यात आली होती. बाबा केदारनाथ आज वाजत गाजत मुरवणुकीने उखीमठ इथल्या ओंकारेश्वर मंदिरात निवासाकरता रवाना झाले. या मोसमात १७ लाख ६८ हजार ७९५ यात्रेकरूनी केदारनाथाचं दर्शन घेतलं. येत्या शनिवारी केदारनाथांची पालखी उखीमठच्या ओंकारेश्वर मंदिरात पोहचेल तिथे ६ महिने त्यांचा मुक्काम असेल.