डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान फुलपाखरांच्या सर्वाधिक प्रजाती असलेलं देशातलं दुसरं उद्यान

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान फुलपाखरांच्या सर्वाधिक प्रजाती असलेलं देशातलं दुसरं सर्वात मोठं उद्यान ठरलं आहे. या उद्यानात फुलपाखरांच्या ४४६ पेक्षा जास्त प्रजाती आढळून आल्या आहेत. अरुणाचल प्रदेशातलं नमदाफा राष्ट्रीय उद्यान फुलपाखरांच्या सर्वाधिक प्रजातींसह देशात पहिल्या स्थानावर आहे.काझीरंगा इथले युवा शास्त्रज्ञ मॉन्सून ज्योती गोगोई यांनी दीर्घकाळ घेतलेल्या नोंदी आणि निरीक्षणानंतर काझीरंगानं हा विक्रम नोंदवला आहे.