अनधिकृत कत्तलखाने असताच कामा नये, अशी शासनाची भूमिका असून अशा कत्तलखान्यांवर तातडीनं कारवाई करायचे निर्देश पोलिसांना देऊ, असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिलं. आमदार विक्रांत पाटील यांनी मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातल्या अवैध कत्तलखान्यांमधलं रक्तमिश्रित पाणी नदीसंगमात सोडलं जात असल्याबाबतची लक्षवेधी सभागृहात उपस्थित केली, त्याला ते उत्तर देत होते.
नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीतही असं रक्तमिश्रित पाणी सोडलं जात असल्याचा मुद्दा पाटील यांनी अधोरेखित केला. अशा प्रकारची कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचं सरकारने दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे, मात्र याचे पुरावे असलेला pendrive आणि छायाचित्रं सभागृहाच्या पटलावर ठेवत असल्याचं पाटील म्हणाले. यावर मंत्री सामंत यांनी याची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिलं. भविष्यात महानगरपालिकेच्या अधिकृत कत्तलखान्यातच कत्तल करायचा निर्णय घेण्यात आला असून तसे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.