पाकव्याप्त काश्मीरमध्ये गिलगिट-बाल्टिस्तानच्या घिझर जिल्ह्यात हिमनदी फुटल्यामुळे महापूर आला असून, भूस्खलन झाल्यामुळे ३०० पेक्षा जास्त घरं आणि दुकानं उद्ध्वस्त झाली आहेत.
या भागातला मोठा भूप्रदेश पुराच्या पाण्याखाली आल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत २०० पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचं वृत्त आहे.