काशी तमिळ संगमम उपक्रमाच्या चौथ्या आवृत्तीचं उदघाटन

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज वाराणसी इथं काशी तमिळ संगमम उपक्रमाच्या चौथ्या आवृत्तीचं उदघाटन केलं. काशीमधल्या नमो घाटावर आयोजित या कार्यक्रमात तामिळनाडूतून आलेले चौदाशेहून अधिक प्रतिनिधी भाग घेत  आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन हे देखील यावेळी उपस्थित होते.  

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमामुळे एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना आणखी दृढ होईल, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.