डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 23, 2025 8:29 PM | Dr. S Jaishankar

printer

भारत हा वैविध्यपूर्ण देश असून, इथं एक भारत श्रेष्ठ भारत हे तत्व दिसून येतं-परराष्ट्रमंत्री

भारत हा वैविध्यपूर्ण देश असून, इथं वेगवेगळ्या संंस्कृती असल्या तरी एक भारत श्रेष्ठ भारत हे तत्व दिसून येतं, असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज वाराणसीत काशी तामीळ संगमम महोत्सवात बोलत होते. काशी हे भारताचं सांस्कृतिक केंद्र असून काशी आणि तामिळनाडू यांच्यात वर्षोनुवर्ष रुजलेल्या विशेष नात्याचा हा उत्सव आहे, असं ते म्हणाले. 

 

बनारस हिंदू विद्यापीठाच्या आय आयटीच्या विद्यार्थ्यांशी झालेल्या दुसऱ्या सत्रात जयशंकर म्हणाले की, राष्ट्रउभारणीत परंपरा आणि तंत्रज्ञान या दोन्हीची गरज असते यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कायम भर दिला आहे. जगाला भारताकडून अधिक अपेक्षा आहे, आणि जगाबद्दल आपल्या देशाची जबाबदारी मोठी आहे, असं ते म्हणाले. 

 

यावेळी त्यांनी तामीळ परदेशी प्रतिनिधींशी संवाद साधला.