November 10, 2024 3:30 PM | Pandharpur

printer

कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यानिमित्तानं पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरावर विद्युत रोषणाई

येत्या १२ नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यानिमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. मंदिर समितीचं प्रवेशद्वार, मंदिराचं शिखर, सात मजली दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाला आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा दिवस वारकरी सांप्रदायासाठी प्रचंड आनंद आणि उत्साहाचा दिवस असतो. पंढरपुरात या दोन्ही दिवशी मोठी जत्रा भरते. हजारो भाविक पंढरपुरात दाखल होतात. कार्तिकी एकादशीच्या वारीसाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यांमधून शेकडोंच्या संख्येनं दिंड्या आणि पालख्या पंढरीत दाखल होत असतात.