कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात काल संध्याकाळी गणेश मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या गर्दीत एक मालवाहू ट्रक घुसून झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. तर १८ हून अधिक जण जखमी झाले आहेत. समोरुन येणाऱ्या दुचाकीला टाळताना हा अपघात झाला. या अपघातात चालकही जखमी झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.