कर्नाटकातल्या म्हैसूर पॅलेस जवळ झालेल्या हेलियम सिलिंडरच्या स्फोटामुळं मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या आता दोनवर पोचली आहे. मृतांमध्ये गंभीर जखमी झालेल्या एका महिलेचा समावेश आहे. या दुर्घटनेत अन्य काही नागरिकही जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कर्नाटकच्या पर्यटन विभागानं आवश्यक कार्यवाही करायला सुरुवात केली असल्याची माहितीही परमेश्वर यांनी यावेळी दिली.