December 25, 2025 1:41 PM | chitradurga | karnatak

printer

कर्नाटकात चित्रदुर्ग इथं झालेल्या अपघातात किमान १० जण ठार

कर्नाटकात चित्रदुर्ग इथं आज पहाटे झालेल्या अपघातात किमान १० जण ठार झाले. एक भरधाव ट्रक एका प्रवासी बसला आदळून तिला आग लागली आणि बसमधले प्रवासी होरपळून मृत्यूमुखी पडले. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. 
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख आणि जखमींना ५० हजार रुपये द्यायची घोषणा केली आहे.
तमिळनाडू अपघात/हिंस/अंकिता
तमिळनाडूत तिरुचिरापल्ली-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर काल अपघात होऊन ७ जणांचा मृत्यू झाला. तमिळनाडू राज्य परिवहन मंडळाच्या बसचं टायर फुटल्यानं चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि ही बस दोन कारवर आदळली. यात कारमधून प्रवास करणारे सात जण जागीच ठार झाले. 
सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.