देशभर आज कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली.
देशाच्या आत्मसन्मानाचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांचं आपण स्मरण करतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिनानिमित्त संदेशात म्हटलं आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कारगिल विजय दिना निमित्त्त नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनीही आज कारगिल विजय दिनानिमित्त देशाच्या वीर जवानांना आदरांजली वाहिली.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कारगिल विजय दिनानिमित्त समाजमाध्यमावरून हा विजय साकार करणाऱ्या सर्व अधिकारी आणि जवानांना नमन केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त समाजमाध्यमावरून आदरांजली वाहिली. मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या भारतीय लष्कराचा गौरवशाली इतिहास सांगणारा हा दिवस असल्याचं त्यांनी नमूद केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही जवानांना आदरांजली वाहिली.