महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लडाखमध्ये आयोजित सरहद शौर्यथॉनला हिरवा झेंडा दाखवला. या मॅरेथॉनमध्ये देशभरातून अडीच हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले असून यातून देशाचा आपल्या लष्करावरचा दृढ विश्वास दिसून येत असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. कारगील विजय दिवसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि सरहद संस्थेनं आयोजित केलेला हा उपक्रम जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये शांतता, देशभक्ती आणि पर्यटन या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे, असं ते म्हणाले. कारगिल युद्ध स्मारकासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे तीन कोटी रुपयांचा धनादेश त्यांनी यावेळी लष्कराकडे सुपूर्द केला.
Site Admin | June 22, 2025 2:43 PM | Kargil | Maharashtra
लडाखमध्ये आयोजित सरहद शौर्यथॉनचं उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
