२० वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या काजल हिनं महिलांच्या ७२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. बल्गेरिया इथं झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिनं अटीतटीच्या सामन्यात चीनच्या प्रतिस्पर्ध्याचा ८-६ असा पराभव केला.
दुसरीकडे महिलांच्या ५३ किलो वजनी गटात सारिका हिनं, तर ५० किलो वजनी गटात श्रुती हिनं कांस्यपदकांची कमाई केली. पुरुषांच्या ग्रीको-रोमन प्रकारात ६० किलो वजनी गटात सूरजनं कांस्यपदक जिंकलं. या स्पर्धेत आत्तापर्यंत भारतीय कुस्तीपटूंनी दोन सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली आहे.