कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये स्थगित करण्यात आलेली कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सुरू होत आहे. सिक्कीममधल्या नाथुला खिंड आणि उत्तराखंडमधल्या लिपुलेख खिंड मार्गावरून ही यात्रा सुरू होणार असून जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
तसंच यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी सिक्कीम सरकार केंद्र सरकारच्या मदतीनं पायाभूत सुविधांमध्ये वाढ करेल असंही सागितलं आहे.