डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कैलास मान सरोवर यात्रेला सिक्कीम इथून प्रारंभ

कैलास मान सरोवर यात्रेला काल सिक्कीम इथून प्रारंभ झाला. सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांनी नथु ला मधून जाणाऱ्या 36 यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. नथु ला खिंडीच्या दुसऱ्या टोकाला चीनच्या अधिकाऱ्यांनी यात्रेकरुंचं स्वागत केलं. तिबेटच्या स्वायत्त प्रदेशातली कैलास मानसरोवर यात्रा पाच वर्षांच्या कालावधीनंतर यंदा होत आहे.