डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

कैलास मानसरोवरला जाणाऱ्या यात्रेकरूंची पहिली तुकडी गंगटोकला पोहोचेल

कैलास मानसरोवरला जाणाऱ्या यात्रेकरूंची पहिली तुकडी उद्या सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं पोहोचेल. सिक्कीम सरकारनं यात्रेकरूंच्या स्वागताची सर्व तयारी केली आहे. तब्बल पाच वर्षांनंतर सिक्कीम मार्गे कैलास मानसरोवर यात्रेला प्रारंभ होत आहे. 

२० जूनपासून यात्रेला सुरू होणार असून नाथू खिंडीतून रवाना होणाऱ्या यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती सिक्कीमच्या पर्यटन आणि नागरी उड्डाण विभागाचे अप्पर मुख्य सचिव सी एस राव यांनी दिली. पहिल्या तुकडीत ३५ यात्रेकरू आहेत. यात्रेकरूंची आवश्यक ती आरोग्य तपासणी केली जाईल तसंच त्यांना वैद्यकीय सामुग्री देण्यात येणार असल्याचंही राव यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.