सरकार नाथूला मार्गे कैलास मानसरोवर यात्रा सुरु करण्यासाठी सज्ज

सरकार ५ वर्षानंतर नाथू ला मार्गे कैलास मानसरोवर यात्रा सुरु करण्यासाठी सज्ज आहे. यात्रेकरूंचा पहिला गट १५ जूनला गंगटोक इथं दाखल होईल. यात्रेकरूंचे १० गट यात्रेला जाणार असून प्रत्येक गटात ४८ यात्रेकरू असतील. सुमारे २१ दिवसांच्या प्रवासानंतर हे गट मानसरोवरला पोहोचतील. यात्रेसाठी रवाना होण्यापूर्वी हे यात्रेकरू दिल्लीत वैद्यकीय तपासणीसाठी थांबतील. भगवान शंकराच्या दर्शनासाठी केली जाणारी ही यात्रा गंगटोक इथून सुरु होऊन नाथू ला मार्गे कैलास मानसरोवरला जाते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.