November 24, 2025 8:37 PM | Kabaddi World Cup 2025

printer

कबड्डीच्या विश्वचषकाला सलग दुसऱ्यांदा भारतीय महिला संघाची गवसणी

भारताच्या महिला कबड्डी संघानं सलग दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषकाला गवसणी घातली आहे. ढाका इथं झालेल्या सामन्यात त्यांनी आज चायनीज तैपेईच्या संघावर ३५-२८ अशी मात केली. या स्पर्धेतल्या सर्व सामन्यात भारतीय संघ अजिंक्य राहिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल या संघाचं अभिनंदन केलं आहे.