डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

SC: देशातल्या क्रीडा संस्थांची कार्यपद्धती सुधारण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश

देशातल्या क्रीडा संस्थांमधील एकहाती सत्ता संपवून त्यांची कार्यपद्धती  अधिक स्वायत्त, स्वतंत्र आणि न्याय्य व्हावी म्हणून कठोर उपाययोजना करावी लागेल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आशियाई कबड्डी महासंघाच्या अध्यक्षांनी भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या प्रशासकांना लिहिलेल्या अपमानकारक पत्राची दखल घेऊन महाधिवक्ता तुषार मेहता यांना सूचना देताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती कोटीश्वर सिंग यांनी आज हे वक्तव्य केलं. 

 

इराण इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये भारताच्या संघाला सहभागी होण्यात येणाऱ्या अडचणींच निवारण करण्याच्या सूचनाही न्यायालयाने मेहता यांना दिल्या. हौशी कबड्डी महासंघाची मान्यता आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने काढून घेतल्यामुळे भारतीय कबड्डी खेळाडूंना स्पर्धेत भाग घेता येत नव्हता, त्याबद्दल भारताच्या कबड्डी खेळाडूंनी केलेल्या याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आज हे निर्देश दिले.