गेल्या दशकभरात भारत एक जागतिक आर्थिक शक्ती म्हणून उदयाला आला आहे, असं नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी सांगितलं. ते दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत आयोजित सत्रात काल बोलत होते. भारत आता उदयोन्मुख अर्थव्यवस्था राहिला नसून जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनला आहे, असं नायडू म्हणाले. भारताचा विकास व्यापक पायावर आधारित, डिजिटली सक्षम, पायाभूत सुविधांनी सुसज्ज आणि सर्वसमावेशक आहे, डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास हा भारतीय अर्थव्यवस्थेतला महत्त्वाचा बदल आहे, असं नायडू यांनी नमूद केलं.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या परिषदेत बोलताना जागतिक गुंतवणूकदारांना स्वच्छ ऊर्जा वापराच्या प्रसारासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचे आवाहन केले.