डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नेपाळचे प्रधानमंत्री म्हणून के पी शर्मा ओली यांचा शपथविधी

नेपाळचे नवीन प्रधानमंत्री म्हणून के पी शर्मा ओली यांनी आज शपथ घेतली. नव्यानं तयार झालेल्या आघाडीतल्या चार पक्षांच्या २१ सदस्यांनीही त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी या सर्वांना पद  आणि गोपनीयतेची शपथ दिली.   

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी के पी शर्मा ओली यांचं अभिनंदन केलं आहे. भारत-नेपाळ मैत्री अधिक दृढ करण्यासाठी, तसंच उभयपक्षी लाभाचं सहकार्य वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याकरता आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे.