ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या ६९ वर्षांच्या होत्या. ‘गुरू’, ‘मी सिंधूताई सपकाळ’, ‘तिचा उंबरठा’ या चित्रपटांमध्ये, तर ‘मिसेस आमदार सौभाग्यवती’ या नाटकात त्यांनी भूमिका साकारल्या. अनेक दूरचित्रवाहिनी मालिकांमध्ये ही त्यांनी काम केलं होतं . त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या त्या मातोश्री होत्या.
Site Admin | August 16, 2025 7:56 PM | Jyoti Chandekar
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन
