डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

२० वर्षांपेक्षा कमी वयोगटासाठीच्या जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत भारताच्या ज्योती बरवालनं पटकावलं सुवर्णपदक

२० वर्षांपेक्षा कमी वयोगटासाठीच्या जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत भारताच्या ज्योती बरवालने सुवर्णपदक पटकावलं आहे. स्पेनमधे पोंतेवेद्रा इथं ही स्पर्धा झाली. ७६ किलो वजनी गटाच्या फ्री स्टाईल प्रकारात ज्योती बरवालने युक्रेनच्या मारिया ऑर्लेविचला एकही गुण मिळू न देता तिचा दणदणीत पराभव केला. ६८ किलो वजनी गटात सृष्टीने तर ५९ किलो वजनी गटात कोमलने कांस्यपदक पटकावलं. ६२ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या निकीताची लढत  युक्रेनच्या इरिना बोंदारबरोबर होईल.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.