वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरुन हटवण्यासंदर्भात नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या निर्णयाला आव्हान देणारी वर्मा यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्त आणि न्यायमूर्ती ए. जी. मसीह यांनीसांगितलं की, वर्मा यांना, अंतर्गत समितीच्या चौकशी प्रक्रीयेत सहभागी झाल्यानंतर समितीच्या निर्णयाला आव्हान देता येणार नाही.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा दिल्ली उच्च न्यायालयात असताना त्यांच्या घराच्या आवारात मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्यामुळे वादग्रस्त ठरले आहेत.