सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश गवई येत्या २३ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर न्यायमूर्ती सुर्यकांत हे सरन्यायाधीशपदाची सूत्रं स्वीकारतील. या शिफारशीनंतर केंद्र सरकार त्यांच्या नावाची अधिसूचना जारी करेल. त्यानंतर न्यायमूर्ती सुर्यकांत २४ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतील. न्यायमूर्ती सुर्यकांत यांना १४ महिन्यांचा कालावधी मिळणार असून ते ९ फेब्रुवारी २०२७ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.
Site Admin | October 27, 2025 8:48 PM | Chief justice
सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या नावाची शिफारस