डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती

देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ येत्या १० नोव्हेंबरला पूर्ण होत असून, न्यायमूर्ती खन्ना येत्या ११ नोव्हेंबरपासून  सरन्यायाधीश पदाची सूत्रं स्वीकारतील. विद्यमान सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याशी चर्चा करून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय कायदे मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 

 

मुंबई उच्च न्यायालयातही अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून पाच नवीन न्यायाधीशांनी शपथ घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यात निवेदिता प्रकाश मेहता, प्रफुल्ल सुरेंद्रकुमार खुबलकर, अश्विन दामोदर भोबे, रोहित वासुदेव जोशी आणि अद्वैत महेंद्र सेठना यांचा समावेश आहे. हे न्यायमूर्ती आजपासून पुढच्या दोन वर्षांच्या कालावधीसाठी काम करणार आहेत. या नवीन नियुक्त्यांमुळे आता मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची संख्या ६९ झाली आहे.