न्यायाधीशांनी न्यायाच्या चौकटीत राहत सामाजिक भान ठेवून दिलेला न्याय अधिक महत्वाचा असतो, न्यायाधीशांनी घटनात्मक मूल्यांची बांधिलकी ठेवली तर न्यायदान सुकर होतं असं प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातर्फे छत्रपती संभाजीनगर इथं सरन्यायाधीश भूषण गवई यांचा काल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Site Admin | June 27, 2025 9:59 AM | justice
न्यायाधीशांनी न्यायाच्या चौकटीत राहत सामाजिक भान ठेवून दिलेला न्याय अधिक महत्वाचा-सरन्यायाधीशांचं प्रतिपादन
