डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे ५२ वे सरन्यायाधीश

देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांना राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी शपथ दिली. या शपथग्रहण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीश धनखर, लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. गवई यांच्या मातोश्री देखील या सोहळ्यास उपस्थित होत्या. न्यायमूर्ती भूषण गवई पुढचे ६ महिने १० दिवस या पदावर कार्यरत राहतील.