डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांचा उद्या शपथविधी

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आज निवृत्त झाले. १० नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता. निवृत्तीनंतर आपण कोणतंही लाभाचं पद स्वीकारणार नाही असं खन्ना यांनी स्पष्ट केलं असून कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत राहण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. 

 

भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांचा उद्या शपथविधी होणार आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. न्यायमूर्ती गवई भारताचे ५२ वे सरन्यायाधीश असतील.