JUNIOR WOMEN HOCKEY: भारताचा अर्जेंटिनावर २-० असा पराभव

भारताच्या कनिष्ठ हॉकी महिला संघाने चार सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात  अर्जेंटिनाचा २-० असा पराभव केला.  सामन्याच्या सुरुवातीला अर्जेंटिनाच्या मिलग्रोस डेल वेल्ल याने गोल करत सामन्यात आघाडी घेतली होती. मात्र, ४४ व्या मिनिटाला भारताच्या कनिकाने गोल करत सामन्यात बरोबरी साधली. सामन्याच्या निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता. मात्र पेनल्टी शूटऑऊटमधे कर्णधार आणि गोलरक्षक निधीने उत्कृृष्ट बचाव करत अर्जेंटिनाला गोल करण्यापासून रोखलं.  तर लालरीनपुई  आणि लालतन्ततुआंगी यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताला विजय मिळवून दिला. भारताचा यानंतरचा सामना शुक्रवारी चिलीच्या संघाशी होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.