डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

२५ जून संविधान हत्या दिन म्हणून घोषित

२५ जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. १९७५ साली याच दिवशी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती, त्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळण्यात येणार आहे. भारताचं संविधान पायदळी तुडवलं गेलं तेव्हा काय घडलं होतं, याची आठवण करून देणारा हा दिवस असेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याविषयी बोलताना म्हणाले. आणीबाणीमुळे ज्या लोकांना त्रास झाला त्यांच्यासाठी ही आदरांजली ठरेल, असंही प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाले. 

तर लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी लढलेल्यांचा सन्मान करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. हा दिवस पाळल्याने नागरिकांच्या मनात व्यक्तिस्वातंत्र्याची ज्योत तेवत राहील, आणि देशाच्या लोकशाहीच्या  रक्षणाची जाणीव कायम राहील असंही शहा म्हणाले.