वक्फ सुधारणा विधेयक २०२४चा आढावा घेण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना

वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२४ चं पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन केलेली ‘जेपीसी’ अर्थात, संयुक्त संसदीय समिती, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी लोकसभेला आपला अहवाल सादर करेल, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सोशल मीडियावरील संभाषणादरम्यान, दिली. या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख ही संसदीय समिती जाहीर करेल, मुस्लिमांसह,  सकारात्मक योगदान देऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही संस्था किंवा व्यक्तींला या समितीच्या कामकाज प्रक्रियेत सहभागी होता येईल, असं त्यांनी सांगितलं.