डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ज्येष्ठ पत्रकार, लेखिका अनुराधा औरंगाबादकर यांचं निधन

ज्येष्ठ पत्रकार, प्रथितयश लेखिका अनुराधा औरंगाबादकर यांचं काल दीर्घ आजारानं पुण्यात निधन झालं. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. अनुराधा औरंगाबादकर यांनी १९७० साली पत्रकारितेतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची ९० पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीसह त्यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केलं. नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या व्यवस्थापन समितीवरही त्यांनी काम केलं असून वृत्तपत्र विद्या पदवी परीक्षेत त्या पुणे विद्यापीठात द्वितीय तर तर केंद्रात प्रथम आल्या होत्या. काही काळ त्यांनी प्राध्यापकीही केली, त्यांच्या प्रबंधासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता.