January 6, 2026 6:06 PM | Journalist Award

printer

उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा…

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या २०२५ साठीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा आज पत्रकार दिनी झाली. कृ. पां. सामंत जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांना जाहीर झाला. वृत्तपत्र विभागात अशोक अडसूळ यांना, तर वृत्तवाहिनीसाठी ओमकार वाबळे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. वार्ताहर संघाच्या सदस्यांसाठी असलेला पुरस्कार बाळासाहेब पाटील यांना दिला जाणार आहे.