कुलाबातल्या सैनिकी प्रशिक्षण केंद्रात उच्चस्तरीय संयुक्त आंतर सेवा सुरक्षा सराव

सुरक्षेसंदर्भातली नवनवीन आव्हानं आणि  सज्जतेच्या दृष्टीनं मुंबईत कुलाबा इथल्या सैनिकी प्रशिक्षण केंद्रात एक उच्चस्तरीय संयुक्त आंतर सेवा सुरक्षा सराव आयोजित करण्यात आला होता. या दोन दिवसीय सरावात  लष्कर, नौदल, हवाई दल, भारतीय तटरक्षक दल, फोर्स वन पथकाचे जवान  आणि राज्य पोलीस दल सहभागी झाले होते. सुरक्षा दलांमध्ये योग्य समन्वय राखणं आणि सदैव दक्ष  राहून विविध स्तरावरच्या संभाव्य धोक्यांना वेळीच प्रत्युत्तर देण्याचं प्रशिक्षण देणं, हा या सरावाचा उद्देश होता.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.