श्रीलंकेच्या नौदलाची आणि भारतीय नौदलाच्या जहाजांची संयुक्त सरावाला सुरुवात

श्रीलंकेच्या नौदलाची आणि भारतीय नौदलाची जहाजे आयएनएस राणा आणि आयएनएस ज्योती यांच्या संयुक्त सरावाला कालपासून श्रीलंकेत सुरुवात झाली आहे. येत्या २५ ऑगस्टपर्यंत हा सराव सुरु राहणार आहे. अशा प्रकारच्या सरावामुळे गेल्या दोन दशकांपासून दोन्ही राष्ट्रांमधील सागरी सहकार्य मजबूत होऊन परस्पर कार्यक्षमता, सागरी सहकार्य वाढवणे, संयुक्तपणे बहुआयामी सागरी ऑपरेशन्स करताना सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे शक्य झालं असल्याचं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.