September 6, 2024 7:54 PM | Waqf (Amendment) Bill

printer

वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भातल्या संयुक्त समितीची नवी दिल्लीत बैठक

वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भातल्या संयुक्त समितीची आज नवी दिल्लीत बैठक झाली. विविध वक्फ मालमत्तांबाबतचं व्यवस्थापन आणि प्रशासन अधिक सक्षमतेनं व्हावं , यासाठी त्यातल्या त्रुटी वगळण्याची प्रक्रिया नवीन विधेयकामार्फत केली जाणार आहे.  भारतीय पुरातत्त्व विभाग,झकत प्रतिष्ठान, तेलंगणा वक्फ बोर्ड यांनी समितीसमोर आपापली मतं मांडली. लोकसभेचे खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालच्या ३१ सदस्यांच्या या समितीत लोकसभेच्या २१ तर राज्यसभेच्या १० खासदारांचा समावेश आहे.