अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरी आणि कार्यालयांवर FBIनं छापे टाकले आहेत. त्यांच्यावर गुप्त माहितीचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.
२०१९ मध्ये ट्रम्प यांची साथ सोडल्यानंतर बोल्टन हे ट्रम्प यांचे टीकाकार झाले आहेत. याप्रकरणी बोल्टन यांना ताब्यात घेण्यात आलं नसून त्यांच्यावर कुठलेही गुन्हेगारी स्वरुपाचे आरोपही दाखल नाहीत.