अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून जो बायडेन यांची माघार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. बायडेन यांनी काल समाजमाध्यमावर ही घोषणा केली. तसंच त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांना आपला पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करणं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असून डेमॉक्रॅटिक पार्टी आणि देशाच्या हितासाठी अध्यक्षपदाच्या उर्वरीत काळात आपलं कर्तव्य पूर्ण करण्यावर लक्ष देणार असल्याचं बायडेन म्हणाले. या आठवड्याच्या शेवटी आपण देशाशी सविस्तर संवाद साधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

बायडेन यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव वाढला होता. कोविडची लागण झाल्यामुळे बायडेन सध्या त्यांच्या देलावेअर इथल्या निवासस्थानी विलगीकरणात आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.