देशात गेल्या सहा वर्षात सुमारे १७ कोटी नवीन रोजगारांची निर्मिती झाली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं यासंदर्भात जारी केलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०२३-२४ मध्ये ६४ कोटी ३३ लाख रोजगार निर्माण झाले असून सहा वर्षांपूर्वी २०१७-१८ मध्ये ही संख्या ४७ कोटी ५० लाख इतकी होती. याशिवाय बेरोजगारीच्या दरात देखील मोठी घट झाली असून २०२३-२४ मध्ये तो साडेतीन टक्के पर्यंत खाली उतरला आहे.
देशात नव्यानं सुरु झालेले स्टार्टअप्स, स्किल इंडिया, रोजगार मेळावे, पी एम विश्वकर्मा योजना, मनरेगा, पी एम विकसित भारत रोजगार योजना आणि लखपती दीदी यांसारख्या इतर योजनांना या रोजगार निर्मितीचं श्रेय असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.