जम्मू काश्मीरमधल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

जम्मू काश्मीरमधल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाहीच्या उत्सवात सामील व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. विशेषतः तरुण मतदारांनी मतदान करावं, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. केवळ मजबूत सरकारच दहशतमुक्त जम्मू काश्मीर देऊ शकतं, तसंच नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण आणि गतिमान विकास घडवू शकतं असं शाह यांनी म्हटलं आहे.