जम्मू आणि काश्मिरमध्ये भारतीय रेल्वेनं फलोत्पादन विभागाच्या सहकार्यानं कटरा रेल्वे स्थानक ते मुंबई पहिली समर्पित चेरी मालवाहतूक सेवा आजपासून सुरू केली. यामुळे, जम्मू काश्मिरच्या फलोत्पादन क्षेत्राला आणि त्याच्या मुख्य बाजारपेठांशी संपर्क यंत्रणेला प्रोत्साहन मिळणार आहे. नाशवंत मालाला मुख्य बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी विश्वसनीय आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्थाही यामुळे उपलब्ध होणार आहे.
Site Admin | May 31, 2025 6:29 PM
कटरा रेल्वे स्थानक ते मुंबई पहिली समर्पित चेरी मालवाहतूक सेवा आजपासून सुरू
