जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची तिसरी यादी जाहीर

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं तिसरी उमेदवार यादी आज जाहीर केली. यादीत २९ उमेदवारांचा समावेश असून त्यात देविंदरसिंग राणा, पवन गुप्ता, अब्दुल गनी चौधरी आणि बलदेव राज शर्मा यांना संधी मिळाली आहे.