2024 हे वर्ष अंतराळ विज्ञान क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण – डॉ. जितेंद्र सिंग

खासगी क्षेत्राच्या सहभागाने देशाला अंतराळ विज्ञान क्षेत्रात मोठा टप्पा गाठणं शक्य झालं, असं प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं थोड्या वेळापूर्वी ते  प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीने खासगी गुंतवणुकीला दारं उघडल्यामुळे अंतराळ मोहिमांना वेग आला असून गेल्या १० वर्षात या क्षेत्राने ९ टक्के दराने वाढ नोंदवली आहे असं ते म्हणाले. पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित स्पेडेक्स ही इसरोची ९९ वी  मोहीम होती आणि येत्या जानेवारीत १०० वी मोहीम होईल अशी माहिती त्यांनी दिली. यंदा प्रथमच अंतरक्ष दिवस साजरा करण्यात आला. याचा उल्लेख त्यांनी केला. इसरोच्या गेल्या वर्षभरातल्या कामगिरीचा आढावा त्यांनी घेतला. या वर्षात इसरोने एकूण १५ मोहिमा राबवल्या असं सांगून ते म्हणाले की भारताचं अंतराळ स्थानक येत्या २०५०पर्यंत साकार होईल.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.