झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी २९ गुन्हे दाखल

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपासून आत्तापर्यंत राज्याच्या विविध भागांतून १३५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या बेकायदा वस्तू आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी २९ गुन्हे दाखल झाले आहेत. माओवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या सीमांवर संयुक्त कारवाई सुरू आहे.