डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 7, 2024 1:58 PM

printer

झारखंड एनआरसी लागू करणार

झारखंडमध्ये एनआरसी लागू करणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी म्हटलं आहे. झारखंडच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ते दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा लवकरच जाहीर केला जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. बांगलादेशी घुसखोरांमुळे झारखंडची लोकसंख्या समीकरणं बदलत असल्याचं ते म्हणाले. व्होट बँकेसाठी हेमंत सोरेन आणि आघाडी सरकार घुसखोरांना संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.