झारखंडमध्ये गेले दोन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले.
पुराच्या पाण्यात अनेक पूल वाहून गेले असून, अनेक घरांचं नुकसान झालं आहे. सखल भाग पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे बचाव कार्यासाठी एनडीआरएफ ची पथकं तैनात करण्यात आली आहेत.
रांची, हजारीबाग, रामगड, जमशेदपूर, छत्रा आणि सिमडेगा यासारख्या शहरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे, तर ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचं नुकसान झालं आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी अनेक ठिकाणी एनडीआरएफ ची पथकं तैनात करण्यात आली आहेत.