झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या प्रचाराला वेग

झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. रालोआ अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया अर्थात भारतीय राष्ट्रीय विकासात्मक समावेशक आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या आज झारखंडमधे प्रचारसभा झाल्या. झारखंडमधलं हेमंत सोरेन सरकार आदिवासींना व्होटबँक समजून वागवत आहे, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी प्रचारसभेत केला. हिमंता बिसवा सरमा, मिथुन चक्रवर्ती यांनीही रालोआच्या प्रचारसभेला संबोधित केलं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसंच झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याही सभा झाल्या.