डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

झारखंड विधानसभा निवडणूक : दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

झारखंड विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदानही येत्या २० नोव्हेंबरला होत असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांसाठी आतापर्यंत ६३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उद्या या अर्जांची छाननी होणार असून १ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येऊ शकतील. दरम्यान झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. त्याचवेळी अधिकाधिक प्रमाणात मतदान व्हावं यासाठी प्रशासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे.  याचाच एक भाग म्हणून राज्यातल्या १७ लाखांहून अधिक शाळकरी मुलांनी आपल्या पालकांना पत्र लिहून त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं. या मुलांनी, त्यांच्या मातापित्यांनी आणि पालकांनी #MummyPapaVoteDo या हॅशटॅगसह समाजमाध्यमांवर ही पत्रं सामायिक केली असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी के. रविकुमार यांनी सांगितलं.

 

दोन्ही राज्यातल्या निवडणुकांची मतमोजणी येत्या २३ नोव्हेंबरला होणार आहे.