डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 20, 2024 1:27 PM | Manoj Kumar Jha

printer

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करण्याआधी पक्षाला विचारात घेतलं नाही – मनोज कुमार झा

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये जागावाटप करण्याआधी आपल्या पक्षाला विचारात घेतलं नाही, असं राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज कुमार झा यांनी म्हटलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस ७० जागांवर तर राजद आणि मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्ष ११ जागांवर लढणार असल्याचं काल झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी जाहीर केलं होतं. त्यावर राजदने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, जागावाटप निश्चित करण्याआधी इंडिया आघाडीतल्या सर्व पक्षांशी चर्चा केली होती, असं स्पष्टीकरण काँग्रेस नेते राजेश ठाकुर यांनी दिलं आहे.